Sunil Gogate, Vice President of Bharatiya Janata Party Maharashtra Pradesh Kisan Morcha, Distributes Free Umbrellas to Needy Laborers
In a heartwarming gesture, Sunil Gogate, the Vice President of the Bharatiya Janata Party's Maharashtra Pradesh Kisan Morcha, distributed free umbrellas to needy laborers at the Police Ground in Karjat today. This kind act is a testament to Gogate's commitment to serving the community and improving the lives of marginalized workers.
As a prominent leader in the Bharatiya Janata Party, Gogate has been instrumental in various initiatives aimed at supporting farmers, laborers, and other underprivileged sections of society. His dedication to the welfare of the people has earned him widespread recognition and respect.
The distribution of 122 free umbrellas is a thoughtful gesture, considering the scorching heat and unpredictable rains that laborers often face while working outdoors. This small yet significant act of kindness will undoubtedly bring relief and joy to the recipients.
आज, दिनांक 5 जुलै 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता, नाका कामगार, पोलिस ग्राउंड येथे गरजू व गरीब कामगारांसाठी उपाध्यक्ष सूनिलजी गोगटे यांच्या दानशूर व्यक्तिमत्त्वामुळे पावसाळी छत्रींचे वाटप करण्यात आले. त्यांच्या समाजसेवेच्या व्रतामुळे 24 तास, 365 दिवस तत्परतेने पुढाकार घेतला जातो. या कार्यक्रमात 122 छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
या क्षणी उपस्थित मान्यवर:
- सुनीलजी गोगटे
- शहर अध्यक्ष विजयजी जिनगरे
- सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता
- दिनेश गनिगा
- राव सर
- युवा जिल्हा कोषाध्यक्ष मिनेशजी मसणे
- युवा अध्यक्ष सर्वेश गोगटे
- शीतल पाल
- युवा सरचिटणीस प्रियांश जैन
या सर्वांच्या उपस्थितीत गरजू व गरीब कामगारांना मदत करण्यात आली.
समाजसेवेला नेहमी तत्पर असलेल्या या सर्वांना धन्यवाद!
सुनीलजी गोगटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा रॉयल गार्डन कर्जत येथे शेतकऱ्यांना खतांच वाटप करून संपन्न
माजी आमदार सुरेश भाऊ लाडांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश, देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश.
मोफत नेत्र चिकित्सा ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि आरोग्य तपासणी शिबिर भारतीय जनता पार्टी कर्जतच्या वतीने सेवा ही संघटन मानून सुनील गोगटे यांच्या जनसेवा कार्यालयात मंगळवार दिनांक 7 नोव्हेबेर 2023 रोजी मोफत नेत्र चिकित्सा ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले केले होते . त्यास नेहमी प्रमाणे उस्फूर्त प्रतिसाद लाभला. 117 लोकांनी याचा लाभ घेतला यात 14 लोकांना मोतिबिंदु आढ़ळला. त्यातील 9 लोकांना आज शंकरा आय हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिये साठी नेले. तसेच आरोग्य तपासणी मधे काही लोकांना मधुमेह गूढ़गे दुखी आढ़ळली. त्यांना औषधे देऊन उपचार करण्यात आले . शंकरा आय हॉस्पिटल आणि श्रीपाद आयुर्वेदिक क्लिनिक यांनी अतिशय उत्तम रित्या लोकांना तपासले आणि सल्ला दिला. याप्रसंगी माझ्यासह सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता ,महिला मोर्चा शहराध्यक्ष शर्वरीताई कांबळे, चिंचवली ग्रामपंचायत सदस्य सुप्रियाताई भगत , मा तालुका अध्यक्ष महिला मोर्चा, स्नेहा गोगटे , सोनाली जाधव ,राधा बहुतुले, गीता कदम, पुनम डेरवणकर, तालुका आय टी सेल विराज पाटकर ,अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश गवई, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सर्वेश गोगटे, रवींद्र जाधव दर्पण घारे ,अजिंक्य भुंडेरे आणि इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
आज महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कीसान मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र * वसंत स्मृती* दादर येथील कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब, प्रदेश सरचिटणीस विक्रांतजी पाटील साहेब, किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे साहेब आणि महाविजय 2024 लोकसभा प्रवास संयोजक बाळा भेगडे साहेब यांच्या हस्ते देण्यात आली. मा बावनकुळे साहेब विक्रांतजी पाटील साहेब बाळा भेगडे साहेब आणि किसान मोर्चा अध्यक्ष गणेश तात्या भेगडे साहेब यांनी अत्यंत विश्वासाने माझ्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. मी त्यांचा खुप खुप आभारी आहे. त्यांनी टाकलेला विश्वास मी सर्वस्वी प्रयत्न करून भारतीय जनता पार्टी वाढविन आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरविन.....
आज भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुनील गोगटे यांच्या जनसेवा कार्यालयात सेवा पंधरवडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी कर्जत ,शंकरा आय हॉस्पिटल पनवेल आणि हार्मनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने नेत्रचिकित्सा शिबिर आणि मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये 66 जणांची तपासणी झाली त्यात 15 मोतीबिंदुचे रुग्ण आढळले. त्यातील पाच जणांना ऑपरेशन साठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले. तसेच अनेकांना अत्यल्प दरात चष्मे देण्यात आले. तसेच सर्वांची मधुमेय आणि रक्तदाब तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सेवाभावी कार्यकर्ते उपस्थित होते होते. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील गोगटे, जिल्हा सरचिटणीस दीपकजी बेहेरे , जिल्हा उपाध्यक्ष वसंत शेठ भोईर,जिल्हा चिटणीस रमेश जी मुंढे फ्रेंड् ऑफ बीजेपी जिल्हा संयोजक नितीनजी कांदळगावकर तालुका अध्यक्ष राजेशजी भगत, नगरसेवक बळवंत घुमरे, मारुति जगताप, सौ स्नेहा गोगटे,सौ बिनिता घुमरे ,सौ प्रीती तिवारी सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी ,वसंत महाडिक,युवा मोर्चा अभिजीत पटेल,सर्वेश गोगटे ,युवा मोर्चा अभिषेक तिवारी ,कुमार कडू ,राजीव पाटकर, ज्योती कडू , माधवी मित्रगोत्री , मनीषा घारे,समीर सोहोनी, महेंद्र कांबळे , बिलाल आढाल,हरिश्चन्द्र मांडे,राजेश थत्ते,मकरंद गोगटे,चंद्रकांत शिवडेकर ,प्रशांत प्रभुणे,गणेश गवई, दर्पण घारे,पूनम देरवणकर इत्यादी उपस्थित होते.
आज माझ्या घरी मावळचे खासदार मा श्रीरंग आप्पा बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी कर्जतच्या विविध समस्या बाबत चर्चा झाली. त्याच प्रमाणे महाजनसंपर्क अभियान मोदी @9 चे माहिती पत्रक दिले त्यावेळी खासदार असुन सुद्धा त्यांनी अतिशय नम्रपणे माहिती पत्रक घेत माहिती जाणून घेतली.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेब यांनी माझ्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी कर्जतच्या विविध रेल्वे समस्या लांब पल्ल्याच्या गाड्या चे थांबे. यावर सविस्तर चर्चा झाली.दानवे साहेबांनी लवरात लवकर गाड्या कश्या थांबतील यासाठी नक्की कार्यवाही करतो असे आश्वासन दिले.
देशाचे लाडके पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस सेवा हेच समर्पण या भावनेतून भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला... देशाचे लाडके पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भारतीय जनता पार्टीने देशभरात सेवा समर्पण पंधरवडा * 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यत आयोजित केला आहे. त्या अंतर्गत समाजाच्या शेवटच्या घटका पर्यंत जाउन गरीब, गरजू, कष्टकरी, शेतकरी ,दिव्यांग रुग्ण यांना भेटून त्याच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांना यथाउचित मदत करावी अशी कानगिरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिली. त्याचा एक भाग दिव्यांगाची सेवा म्हणुन भारतीय जनता पार्टी कर्जत युवक प्रतिष्ठान मुंबई आणि नवतरुण ॐ कार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने *श्रवण यंत्र वाटप शिबिराचे आयोजन साई मंदिर कोकण आळी दहिवली येथे आज पार पडले . या शिबिरात सुमारे जणांची तपासणी करून 36 लोकांना श्रवण यंत्र अत्यल्प दरात 500 रुपयात देण्यात आले. प्रचंड पाऊस असताना सुद्धा गरजू शिबिरात आले . त्यांना श्रवण यंत्र लावल्या नंतर व्यवस्थित ऐकू येऊ लागल्याने अतिशय आनंदी झाले. त्यांच्या चेहऱ्यावरील हसु पाहून युवक प्रतिष्ठान मुंबई यांचे ऐका सन्मानानी घोष वाक्य सार्थ झाले असे जाणवत होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन भाजप नेते सुनील गोगटे आणि नगरसेविका विशाखा जिनगरे यांच्या विशेष प्रयत्नानी झाले. याप्रसंगी जिल्हासरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर, तालुका सरचिटणीस संजय कराळे, विजय जिनगरे,सर्वेश गोगटे, ओंकार जिनगरे,बिराज पाटकर हरिश्चंद्र मांडे, सूर्यकांत गुप्ता, अभिनय खांगटे असे बहुसंख्य भाजप कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
कर्जत भीमाशंकर जोड मार्ग संघर्ष समितीची बैठक संपन्न
सुनील गोगटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात ई श्रम कामगार कार्डचे वाटप
कर्जत शहरातील वाहतुक कोंडीचा होणार पूर्णविराम .. लवकरच साकारणार बायपास ब्रीज
पूरग्रस्तांसाठी तात्काळ कम्युनिटी किचन सुरू करा - चित्रा वाघ यांची मागणी
पूरग्रस्तांसाठी तात्काळ कम्युनिटी किचन सुरू करा - चित्रा वाघ यांची मागणी
पेण को ऑप बँक ठेवीदारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित... केंद्रीय अर्थ मंत्री भागवत कराड यांना भाजपा नेते सुनील गोगटे यांनी दिले निवेदन
दिल्ली -केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची रायगड भाजपा नेते सुनील गोगटे यांनी घेतली भेट,उद्योगा संदर्भात दिले निवेदन
पेण बँक ठेवीदारांना दिलासा, ठेवीदारांना ९० दिवसात ५ लाख रुपये मिळणार; भाजप नेते सुनील गोगटे यांची माहिती
कर्जत मधील तरुणाईला भाजपाचे आकर्षण..बहुसंख्य तरूणांनी केला भाजपा मध्ये प्रवेश. |
हिंदुस्थान इंसेक्टिसाईड लिमिटेड रसायनी हे भारत सरकारची कंपनीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप नेते सुनील गोगटे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला.
पेण बँक ठेवीदारांना दिलासा, ठेवीदारांना ९० दिवसात ५ लाख रुपये मिळणार; भाजप नेते सुनील गोगटे यांची माहिती
कर्जत मधील तरुणाईला भाजपाचे आकर्षण..बहुसंख्य तरूणांनी केला भाजपा मध्ये प्रवेश. |